Friday, July 10, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलावर तिघांचा हल्ला

Crime News : अल्पवयीन मुलावर तिघांचा हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर एम्स हॉस्पिटलसमोरील हातगाडीवर फळविक्री करणार्‍या अल्पवयीन मुलावर (वय 16) तिघांनी विनाकारण हल्ला करून मारहाण केल्याची घटना रविवारी (28 जून) दुपारी घडली. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्या मोबाईलचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

परशा खुंट, पिंजार गल्ली येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. तो एम्स हॉस्पिटलसमोर हातगाडीवर फळविक्री करतो. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे फळविक्री करत असताना त्याच्या ओळखीचे मोहिज फय्याज शेख, करीम शेख आणि जहीद जावेद शेख (सर्व रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर) हे दुचाकीवर तेथे आले. कोणतेही कारण नसताना मोहिज शेख याने फिर्यादीला दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर करीम शेख व जहीद शेख यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी रस्त्यावर पडल्यावर त्याला ओढत शिवीगाळ करण्यात आली तसेच हात-पाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

या मारहाणीदरम्यान फिर्यादीचा मोबाईलही फोडून त्याचे नुकसान करण्यात आले. आरडाओरडा ऐकून एकाने हस्तक्षेप करून भांडण सोडवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. घटनास्थळी फिर्यादीचे चुलते आले व त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुलै २०२६ – सक्तीचा अतिरेक अन् कर्तव्याचा संकोच!

0
महाराष्ट्रातील शासकीय विभागांचा कारभार विरोधाभासी कोंडीतून जात आहे. एकीकडे प्रादेशिक परिवहन विभाग भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेला असताना त्यावर ठोस उपाय शोधण्याऐवजी सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे...