Thursday, October 1, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार उपनगरातील सेलफोन गाईज मोबाईल शॉपी, पाथर्डी रस्ता येथे बुधवारी (13 ऑगस्ट) दुपारी एका अल्पवयीन मुलावर लोखंडी कोयत्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावतानगर, भिंगार येथील दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महेशनगर, बाराबाभळी (ता. अहिल्यानगर) येथील अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हा बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सेलफोन गाईज मोबाईल शॉपी, पाथर्डी रस्ता येथे असताना संशयित दोघा आरोपींनी त्याला दुकानाबाहेर बोलावले. त्यावेळी फिर्यादी संशयित आरोपींना मोबाईलवर लाईव्ह शिवीगाळ केली नसल्याचे समजावत असतानाच, संशयित आरोपी पैकी एकाने त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या हातावर वार केला. यामुळे फिर्यादी जखमी झाला.

दरम्यान, दुसर्‍या संशयित आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर फिर्यादीस उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरूध्द शिवीगाळ, मारहाणसह आर्म अ‍ॅक्ट 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बी. बी. अकोलकर करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्याची भिती आणि मंत्र-तंत्राचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करुन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ...