Saturday, August 22, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अनैतिक कृत्याचा प्रयत्न

Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अनैतिक कृत्याचा प्रयत्न

आरडाओरडा केल्याने पीडितेची सुटका || अहिल्यानगर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (19 जानेवारी) दुपारी घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण बापु दरेकर, हर्षल संतोष मुरूमकर, सर्वोजित दत्तात्रय मुरूमकर (तिघे रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) व आदित्य अनिल वामन (रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.

- Advertisement -

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील विद्यालयासमोर सोमवारी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत उभी होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या किरण दरेकर आणि हर्षल मुरूमकर यांनी तिला अनैतिक कृत्याच्या उद्देशाने गाठले. पीडितेच्या हाताला धरून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून एका गावाच्या दिशेने पळवून नेले. या गुन्ह्यात त्यांना सर्वोजित मुरूमकर आणि आदित्य वामन यांनी प्रोत्साहन देत साथ दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, अपहरण केल्यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या संशयित आरोपींनी तिला पुन्हा विद्यालयासमोर आणून सोडले आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द अपहरण, विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...