Sunday, May 10, 2026
Homeक्राईमCrime News : प्रेमसंबंध ठेवण्यास दबाव; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Crime News : प्रेमसंबंध ठेवण्यास दबाव; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सतत प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव टाकत, जिवे मारण्याची धमकी देत, समाजात बेइज्जत करण्याची भीती दाखवत, मानसिक त्रास दिला गेला आणि या ताणामुळे पीडितेने आत्महत्या केली. मेघा दत्तात्रय भापकर (रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, यासंदर्भात तिचे वडिल दत्तात्रय पुनाजी भापकर (वय 45 रा. हराळ मळा, गुंडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आदी कलमान्वये बुधवारी (11 जून) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सनी विजय बुध्दिवंत, विजय सुखदेव बुध्दिवंत व सुरेखा विजय बुध्दिवंत (सर्व रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

गुन्ह्याची घटना गेल्या महिन्याभरापासून घडत होती. संशयित आरोपींनी पीडितेवर सतत दबाव टाकून तिला प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला सुन म्हणत चिडवणे, समाजात बदनामी करण्याच्या धमक्या देणे अशा प्रकारचे मानसिक त्रास दिल्यामुळे मुलीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गुन्हा बुधवारी सायंकाळी दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पथकासह भेट दिली आहे. अधिक तपास उपनिक्षक गांगुर्डे करीत आहेत.

दोघांना अटक
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विजय सुखदेव बुध्दिवंत व सुरेखा विजय बुध्दिवंत अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : अशोक खरातची रवानगी नाशिक कारागृहात

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली...