Saturday, June 13, 2026
Homeक्राईमतरूणाची लग्नासाठी बळजबरी; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तरूणाची लग्नासाठी बळजबरी; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निंबळक (ता. अहिल्यानगर) गावातील एका तरुणाने वारंवार 15 वर्षीय मुलीला वारंवार लग्नासाठी बळजबरी केल्याने तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै 2025 मध्ये घडली. चौकशीअंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संदीप साळवे (पूर्ण नाव माहीत नाही) असे त्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, गावातील संदीप साळवे हा मयत मुलीला वारंवार लग्नासाठी दमदाटी करून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक परदेशी गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

जयशंकर

तीन खलाशांच्या मृत्यूवर भारताची कठोर भूमिका; एस. जयशंकर यांची तीव्र शब्दात...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiओमानच्या समुद्रात भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तीन भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारत आणि अमेरिका...