Monday, July 27, 2026
HomeनगरRahuri : दोन अल्पवयीन मुलींची 24 तासात सुटका; आरोपी जेरबंद

Rahuri : दोन अल्पवयीन मुलींची 24 तासात सुटका; आरोपी जेरबंद

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या 24 तासांत शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश आले. त्यांना सुखरूपपणे पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित मुलींच्या वडिलांनी राहुरी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

सदर प्रकरणाचा तातडीने तपास हाती घेत, पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी, पोना. देविदास कोकाटे, पोकॉ. गणेश लिपणे, मपोकॉ. वंदना पवार यांनी पुणे येथे रवाना होऊन, खडकी पोलीस स्टेशनचे सपोनि. संजीव भोसले व महिला दामिनी पथक यांच्या मदतीने दोन्ही मुली व आरोपी हर्षल सतीश इरुळे (रा. गुहा, ता. राहुरी) याला ताब्यात घेतले. मुलींच्या जबाबानुसार, आरोपीने त्यांचा अज्ञानपणा व असाहाय्यता यांचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने पळवून नेले होते. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 87 प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

आरोपीला राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास दि. 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सविता गांधले यांनी युक्तिवाद केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली. तपास पथकात पोउपनि. विष्णू आहेर, पोहेकॉ. सुरज गायकवाड, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. शेषराव कुटे, पोकॉ. आजिनाथ चेमटे, मपोकॉ. वंदना पवार यांच्यासह श्रीरामपूर सायबर सेलचे पोहेकॉ. संतोष दरेकर व पोहेकॉ. सचिन धनाड यांचा समावेश होता.

‘ऑपरेशन मुस्कान’ची यशस्वी अंमलबजावणी
राहुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियान राबवले जात असून, गेल्या दीड वर्षात तब्बल 82 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांचे विद्यार्थिनींना आवाहन
विद्यार्थिनींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये. शाळा, कॉलेज परिसरात कोणतीही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधित विद्यार्थिनीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...