Wednesday, December 4, 2024
Homeनगरराहाता तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करणार - आ. थोरात

राहाता तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करणार – आ. थोरात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्याला गुलामगिरीतून बाहेर पडण्याची ही मोठी संधी आहे. यावेळेस त्यांचा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी या मतदारसंघाचा मतदार आहे. संगमनेरप्रमाणे शांतता सुव्यवस्था आणि वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण काम करत आहोत. बारा दिवस तुम्ही महाविकास आघाडीसाठी द्या.पुढील पाच वर्षे तुमची जबाबदारी आम्ही घेतो, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

शिर्डी येथील नगर परिषदेच्या प्रांगणात प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आ. थोरात बोलत होते. यावेळी खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रभावती घोगरे, रिपाइं नेते बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे सचिन कोते, सुहास वहाडणे, नानाभाऊ बावके, राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे, सखाराम चौधरी, काँग्रेसचे प्रवक्ते सुदर्शन कुमार रॉय, घन:श्याम शेलार, नारायण कार्ले, सचिन चौगुले, सुरेश थोरात, लताताई डांगे, श्रीकांत मापारी, मिलिंद कानवडे, नवनाथ आंधळे, अविनाश दंडवते, पंकज लोंढे, शितल लहारे, संजय शिंदे, सुधाकर शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, साठ वर्षांत ज्यांना एमआयडीसी करता आली नाही. त्यांनी फक्त एमआयडीसीचे गाजर दाखवले आहे. प्लॉट कोणाला दिले याची चौकशी झाली पाहिजे. नगर-मनमाड रस्त्याने अनेकांचे जीव घेतले. रस्ता ज्यांना करता आलो नाही ते काय विकास करणार, असा सवाल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ज्यांनी विनाकारण त्रास दिला, त्या सगळ्यांची दुरुस्ती करू, असा इशाराही त्यांनी दिला.

खा. निलेश लंके म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. संगमनेर तालुक्यात विकासाचा नवा मापदंड त्यांनी निर्माण केला आहे. संगमनेर आणि राहात्याची तुलना कधीच होऊ शकत नाही. तिकडे संस्कृती आहे तर इकडे दडपशाही आहे. या दडपशाहीतून मुक्तीसाठी नागरिकांना मोठी संधी आहे. प्रभावती घोगरे शिर्डी मतदार संघातून विधानसभेत जायंट किलर ठरतील.

प्रभावती घोगरे म्हणाल्या, शिर्डी येथील सभेतील उपस्थितीने अनेकांना धडकी भरली आहे. एकेकाळी समृद्ध असलेला राहाता तालुका यांनी उद्ध्वस्त केला आहे. यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे, घनश्याम शेलार, बाळासाहेब गायकवाड, सुहास वहाडणे, नानाभाऊ बावके, शशिकांत लोळगे, भाऊसाहेब कातोरे, नारायण कार्ले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिर्डीसह परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या