Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआदिवासी आमदारांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या, नेमकं काय आहे कारण?

आदिवासी आमदारांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या, नेमकं काय आहे कारण?

मुंबई । Mumbai

राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त करत, निवडणुकीत...