Thursday, March 13, 2025
Homeनगरआ. संग्राम जगताप यांचा अर्ज वैध; तिघांचे उमेदवारी अर्ज अवैध

आ. संग्राम जगताप यांचा अर्ज वैध; तिघांचे उमेदवारी अर्ज अवैध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार जगताप यांच्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार किरण गुलाबराव काळे यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी या हरकतीच्या अनुषंगाने आ. जगताप यांना नोटिस काढली. त्यावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली. आक्षेप आणि त्यावरील म्हणणे पुरावे विचारात घेऊन रात्री उशिरा आ. जगताप यांचा अर्ज वैध ठरविला.

- Advertisement -

दरम्यान, अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघासाठी 27 इच्छुकांनी 37 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील तिघांचे अर्ज अवैध ठरविले असून 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले गेले असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. आ. जगताप यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार काळे यांनी बुधवारी छाननी दरम्यान हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दुपारी सुनावणी ठेवली होती. यावर दोन्ही बाजूचे म्हणणे मांडण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेत आ. जगताप यांचा अर्ज वैध ठरविला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...