Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuresh Dhas : "संतोष देशमुखांच्या हत्येची सुरूवात एप्रिलमध्येच, खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर..."; आमदार...

Suresh Dhas : “संतोष देशमुखांच्या हत्येची सुरूवात एप्रिलमध्येच, खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर…”; आमदार धस यांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

गेल्या महिन्यापासून बीड (Beed) येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्यापासून झाली होती. १४ जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मिक कराडला खटकली. त्यामुळे वाल्मिकने जोशीला खडसावलं आणि त्यानंतर १९ जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली”, असे त्यांनी म्हटले

तसेच “या बैठकीत (Meeting) कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमती दाखवली. यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच ५० लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना ५० लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मिक कराडने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी (Extortion) बैठका झाल्याचं म्हणत”, आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला.

अजितदादा तुमच्या पाया पडतो

अजित पवार (Ajit Pawar) हे प्रांजळ मनाचे आहेत, पाच वर्षाच्या लेकरासारखं त्यांचे हृदय आहे. ते कधीच चुकीचे काम करत नाहीत. आपणही १० ते ११ वर्षे राष्ट्रवादीत अजितदादा यांच्यासोबत काम केले. आपण काही लोकांना घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या कामासाठी संबंधितांना फोनवरून सूचना देण्याची विनंती त्यांना केली होती. पण त्यांनी तसे करण्यास साफ नकार दिल्याचा किस्सा धस यांनी यावेळी सांगितला. अजितदादा, तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकलं यांच्यापाशी, याला (धनंजय मुंडे) मंत्रिमंडळातून अगोदर बाहेर काढा. ते सातपुडा या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका घेत आहेत. ही माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना विनंती आहे की,या गोष्टीचा छडा लावा”, असे आमदार सुरेश धस म्हणाले.

वाल्मिक कराडकडे १७ मोबाईल

संतोष देशमुख हत्याप्रकरणासह खंडणीच्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर सुरेश धस यांनी यावेळी चांगलाच हल्लबोल केला. ते म्हणले की, वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा जवळचा नितीन कुलकर्णी हा अचानक गायब झाला आहे, त्याला पोलिसांनी समोर आणावे. वाल्मिक कराड या आकाच्या खंडणीचे सर्व धागेदोरे या १७ मोबाईलच्या मार्फत, सीडीआरच्या माध्यमातून सहज काढता येतील. या १७ मोबाईल आणि नितीन कुलकर्णी यांच्याविषयीची माहिती सीआयडी आणि पोलीस अधिक्षकांना दिली आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...