नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) होणारा ‘घोडेबाजार’ आणि घाणेरडे राजकारण मान्य नसल्यामुळे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Nashik Vidhan Parisahd Election) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीतील भ्रष्ट प्रथांना खतपाणी न घालता या पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतल्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी भरला महायुतीकडून उमेदवारी अर्ज; गिते बंधूही रिंगणात, बंडखोरी होणार?
निवडणुकीपासून दूर राहण्याचे नेमके कारण काय? यावर बोलताना मिर्लेकर यांनी सांगितले की, “या निवडणुकीत मतदारांचा जो ‘रेट’ सुरू आहे, तो सर्वश्रुत आहे. आमची आर्थिक परिस्थिती आणि संख्याबळ पाहता, आम्ही या घोडेबाजारात सहभागी होणे टाळले आहे. माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) अर्ज भरण्याच्या तयारीत होते. मात्र, पक्षाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उमेदवारी मागे घेण्याचे ठरले. महाविकास आघाडीचा जो अधिकृत उमेदवार असेल, त्याला पाठिंबा देण्याबाबत विचार केला जाईल, मात्र कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुती-मविआमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडे; माजी आमदारांना उमेदवारी, गणेश गितेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, या पत्रकार परिषदेला उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हा संघटक केशव पोरजे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नगरसेवकांशी लवकरच चर्चा
लवकरच पक्षाच्या ५२ नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मतदानाबाबत योग्य त्या सूचना दिल्या जातील. जर पक्षाचा आदेश झुगारून कोणीही इतर उमेदवारांना सूचक म्हणून स्वाक्षरी केली असेल तर अशा लोकप्रतिनिधींवर पक्ष कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा मिर्लेकर यांनी दिला आहे. या निर्णयाचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला असून, मित्रपक्षांनाही त्याबाबत कल्पना देण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात भूमिका जाहीर करणार




