नाशिक । प्रतिनिधी | Nashik
पावसामुळे (rain) शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे (potholes) पडले आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारे साथीचे रोग (Epidemic diseases) देखील पसरले आहे. अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले असले तरी महापालिका प्रशासन (Municipal Administration) मात्र पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करीत नसल्याने
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक पवित्रा घेत थेट महापालिका गाठत महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्त बाहेर असल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन दालनात त्यांना याबाबत जाब विचारले. तसेच त्यांचा घेराव करण्यात आला. यामुळे सुरक्षा यंत्रणाची धावपळ उडाली होती. दरम्यान मनसैनिकांनी महापालिकेच्या समोरील रस्त्यांच्या खड्ड्यांवर (potholes) पुष्पगुच्छ (bouquet) करून अनोख्या पद्धतीने आंदोलन (agitation) केले.
शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे (potholes) तसेच साथीचे आजार (Epidemic diseases) आणि डेंग्यू (Dengue), स्वाइन फ्लू (swine flu) या आजारावरून मनसेना आक्रमक झाली. अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घोषणा देत अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम (Additional Commissioner Ashok Atram) यांचा घेराव करण्यात आला. शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्थाबाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सलग पावसाने (rain) नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत समाजातील विविध स्तरांवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत . राज्य शासनाच्या (State Govt) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावलीप्रमाणे रस्ते बनविणार्या कंत्राटदारांनी ठराविक मुदतीसाठी संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे.
असे असताना अधिकार्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळ्या अगोदर रस्ते डांबरीकरणाची (Asphalting of roads) मलई खाऊन परत पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे सर्वविदित आहे.
शहरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधीत कंत्राटदारास दोषी धरून त्यास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुजाता डेरे, संतोष पिल्ले, महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील, गणेश मोरे संदेश जगताप, ललित वाघ, विजय आहिरे, योगेश पळेकर, विजय अहिरे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, विजय आगले, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते.




