मुंबई | Mumbai
गेल्या आठड्यात शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांनी बंडखोरी करुन शिवसेना शिंदेंच्या गटात प्रवेश केला. तर मंगळवारी (३०) जूनला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील एक आमदार फुटला. सध्या सुरु असलेल्या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच
“प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडे आहे. कुठल्या पद्धतीचे हे राजकारण सुरु आहे. मला वाटते लोकांमध्ये या बद्दल प्रचंड संताप आहे” अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे गटातील फुटीर खासदार- आमदारांबाबत बोलताना त्यांनी हे मत मांडले. ते बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भाजपला (BJP) लक्ष्य केले. भविष्यात या सगळ्याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
PM Narendra Modi: ‘डिजिटल इंडिया’ हा विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा एक भक्कम पाया – पंतप्रधान मोदी
तुम्ही बाहेरचे विरोधी पक्ष संपवणे हे सोडून द्या, पण तुमच्यात विरोधक निर्माण झालेत
जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे. कुठल्या पद्धतीचं हे राजकारण सुरु आहे. मला वाटतं लोकांमध्ये या बद्दल प्रचंड संताप आहे” आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचं, याला मर्यादा आहेत की नाही? ज्या ज्या वेळेला जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना संपावले आहे, त्यावेळी त्यांच्यातूनच दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवले आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरु झाली आहे. तुम्ही बाहेरचे विरोधी पक्ष संपवणे हे सोडून द्या, पण तुमच्यात विरोधक निर्माण झालेत, तुम्हाला त्रास होईल तो तुम्हीही बघून घ्याल. हा जगाचा इतिहास आहे. आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा उलटा बंगला
पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा उलटा बंगला आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा काहीही म्हणा. पण भाजप आज मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही. आता जे राजकारण खेळताय, ते तुमच्याशी अंगाशी येणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
बेधुंद सत्ता येते तेव्हा माणसं अशी वागायला लागतात
तसेच हे सगळे अमित शाहांचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे ६ खासदार फोडले ते भाजपात का गेले नाही? टीएमसीचे २२ खासदार फुटले त्यांचा वेगळा गट का तयार केला..उद्या मला पंतप्रधानपदावर दावा करायचा असेल तेव्हा मला आतून विरोध झाला तेव्हा हे लोक बाहेरून मला पाठिंबा देतील. जर दुसऱ्या कुणी दावा सांगितला तर मी जे लोक उभे केले आहेत त्यातले कुणी पाठिंबा देणार नाही. समोरचे विरोधक संपवता तेव्हा विरोधक तुमच्यातच तयार होतात. हे चित्र महाराष्ट्रात आणि देशात तुम्हाला दिसेल. अगदी खालपर्यंत दिसेल. बेधुंद सत्ता येते तेव्हा माणसं अशी वागायला लागतात असं सांगत राज ठाकरे यांनी अमित शाहांवर निशाणा साधला.
फटका भविष्यात भाजपालाही बसणार
दरम्यान, महाराष्ट्रात ३ वर्षांनी निवडणुका आहेत. आता ही SIR प्रक्रिया राबवणार, दरवर्षी मुले १८ वर्षांची होत असतात. अनेक माणसे घरे बदलतात. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवून चालणार नाही तर सुरूच ठेवावी लागेल. SIR प्रक्रियेचा सर्वात मोठा फटका पश्चिम बंगालला, बिहारला बसला. पश्चिम बंगालमधून जवळपास २७ लाख मतदारांची नावे काढली गेली. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव होतो. हे जे काही घाणेरडे राजकारण सुरू आहे त्याचा फटका भविष्यात भाजपालाही बसणार आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आलेले नाही. आपण करत असलेली कृती आणि काय पायंडा पाडतोय हे राजकीय पक्षांच्या लक्षात येत नसेल तर भविष्यातील पुढच्या पिढीची चिंता वाटते. राजकारण येते, जाते पण आपण महाराष्ट्र, देश कुठे नेणार आहोत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.




