Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनसेच्या 'दीपोत्सवाचं' उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मनसेच्या ‘दीपोत्सवाचं’ उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई ।

- Advertisement -

मनसेकडून दरवर्षी दिवाळीला ‘दीपोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे. यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं हे 13 वे वर्ष आहे. यंदाही ‘दीपोत्सव’ सोहळा संपन्न झाला . मुंबईतील शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘दीपोत्सव 2025’ सोहळ्याचे उद्धाटन यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यंदा मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे आणि उद्धव उध्दव हे दोन भाऊच नाही तर दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यही एकत्र आले होते.

आजची दिवाळी आगळी वेगळी असून विशेष असल्याचे व मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्या शिवाय राहणार नाही , असेच सर्व जण आनंदात राहा व सर्वांना आनंद देत राहा असे उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या वेळी कुठेलेही राजकीय भाष्य करण्यात आले नाही.

या वेळी दादरचं शिवाजी पार्क दिव्यांनी सजलं होत. दिव्यांचा झगमगाट व लायटींगच्या लखलखाटात परिसर उजळून निघाला होता. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी होती यावेळी फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात असून केवळ, औपचारीत घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...