Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTrimbakeshwar : त्र्यंबकेश्वर विभागात मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन सेवेत दाखल

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर विभागात मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन सेवेत दाखल

चार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपासकार्यात होणार मदत

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर |

पेठ-त्र्यंबकेश्वर पोलीस विभागातील वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालन गृह विभाग यांच्या माध्यमातून पेठ त्र्यंबकेश्वर विभागात मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन सेवेत दाखल झाली आहे. या फॉरेन्सिक विभागाचे काम हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पेठ विभाग, कॅम्प त्र्यंबकेश्वर येथून असणार आहे.

पेठ उपविभागात येणारे पेठ तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, हरसूल व नाशिक तालुका या चार पोलिस ठाण्यांमध्ये या टीमचे कार्यक्षेत्र असून घटनास्थळावर दाखल होत महत्त्वाचे भौतिक पुरावे जमा करून त्याची पोलीस तपासात मदत होणार आहे. या मोबाइल व्हॅनमध्ये आठ कर्मचारी कार्यरत राहणार असून ते दोन शिफ्ट मध्ये काम करणार आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधीकारी वासुदेव देसले यांच्या हस्ते मोबाइल व्हॅनला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढून पूजा करण्यात आली. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक पगार, गावित, हवालदार लोहार, अंमलदार तुषार केंग, मोहित सोनवणे, सागर रहाडे, प्रदीप बागूल, मोबाइल व्हॅनचे रासायनिक विश्लेषक प्रसाद आढाव, रिंकू अय्यर आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकसह प्रादेशिक फॉरेन्सिक लॅब्सचा कायापालट! एका वर्षात एनएबीएल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) आरोपींना शिक्षा घडवून आणण्यासाठी न्यायालयात सादर केले जाणारे डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे किती विश्वासार्ह आणि अचूक...