Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या;...

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याने या चर्चांना पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.

विलिनीकरणाच्या चर्चांना पवारांचा पूर्णविराम?
गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विशेषतः दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणासंदर्भात विविध स्तरांवर चर्चा असल्याचे समोर येत होते. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. “आपण कुठेही जाणार नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या,” अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे सध्या सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे. मात्र, पुढील काळात दोन्ही गटांमध्ये प्रत्यक्ष राजकीय संवाद किंवा अन्य काही हालचाली होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी पक्षाची आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही कोणासोबतही जाणार नाही. आम्ही सत्तेसोबत जाणार नाही. कोणाला आमच्यासोबत यायचे असेल, तर त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावे,’ अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यंतरी शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन एनडीए आघाडीत सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल, अशीही वदंता होती. मात्र, शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या आहेत. आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु, असे शरद पवार यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया

0
मुंबई । Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीनंतर दोन्ही तट एकत्र येण्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सुनेत्रा पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी या...