Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

राज्यात आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्रात पुढील सात दिवस म्हणजेच शुक्रवार (दि. ३१) पर्यंत मुंबई सह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र खान्देश विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते,असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

विशेषतः नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड धाराशिव लातूर आदी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

पावसाची शक्यता कशामुळे?
शनिवारी पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्यला ४०० कि.मी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता जाणवते.

अग्नेय बंगाल उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे मध्य बंगाल उपसागारात मार्गक्रमण होऊन तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर व २६ तारखेला चक्रीवादळ व २८ तारखेला तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा...