कोलकत्ता |वृत्तसंस्था
भारतात स्वभुमीवर होत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात 22 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरूवात होत आहे. पहिला सामना कोलकात्यामधील ईडन गार्डनवर होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियात मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले असून कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडेच आहे तर अक्षर पटेलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहम्मद शमी नोव्हेंबर 2023 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळला होता. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे जवळपास 14 महिने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहिला. देशांतर्गत स्पर्धत शमीने आपल्या गोलंदाजीची धार पुन्हा एकदा दाखवली. त्यामुळे त्याची संघात निवड झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या साथीला मोहम्मद शमी असेल तर सामना रंगतदार होणार आहे.
टीम इंडियाचा असा असेल संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल