Wednesday, December 4, 2024
Homeनगरसातव्या माळेला लाखो भाविकांनी घेतले मोहटादेवीचे दर्शन

सातव्या माळेला लाखो भाविकांनी घेतले मोहटादेवीचे दर्शन

पोलीस दलाकडून मानाची साडीचोळी अर्पण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शारदीय नवरात्र उत्सवातील सातव्या माळेच्या पर्वणीला लाखो भाविकांनी श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर येऊन देवीचे दर्शन घेतले. देवी भक्तांची मोठी गर्दी गडावर पाहायला मिळाली. मंगळवारी रात्रीपासूनच पायी भाविकांसह वाहनांची गर्दी होती. बुधवारी दुपारी गर्दीत वाढ झाली. दरम्यान, मोहटा देवी गडाकडे अनेक पायी दिंड्या देवीच्या भक्ती गीताचे गायन करून देवीची आराधना करत देवी गडापर्यंत पोहोचल्या.

- Advertisement -

पाथर्डी शहरातील प्रत्येक मुख्य चौकामध्ये वाहन आणि माणसाची गर्दीच गर्दी मंगळवारी रात्री पाहायला मिळाली. शहरात रात्री विजेचा लपंडाव सुरू होता. बराच काळ वीज गायब झाल्याने भाविकांना अंधारातून वाट काढत पुढे जावे लागले. सातव्या माळेसाठी पायी आलेल्या भाविकांनी पहाटे मंदिर व गड परिसरात जिथे जागा मिळेल तिथे मुक्काम केला. मोहटादेवी मंदिरातील व्हीआयपी मार्ग, लिफ्ट व इतर असलेले मंदिराकडे जाण्याचे मार्ग देवस्थान समितीकडून गर्दी पाहता बंद करण्यात आले होते. या मार्गाचा फायदा घेऊन अनेक भाविक येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवले. महामंडळाकडून प्रवाशांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या तीव्र उन्हातही भाविकांचा उत्साह देवीच्या दर्शनासाठी होता. देवस्थान समितीकडून माहिती सुविधा कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाणचे प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, अग्निशामक, पाणी, फराळ, सीसीटीव्ही सुरक्षा, देवस्थानचे व खाजगी सुरक्षा रक्षक अशा विविध सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.

अनिरूध्दज् अकॅडमी, श्री शनेश्वर धार्मिक सामाजिक सेवेकरी यांनी मनुष्यबळ पूर्वत गर्दीच्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी सेवा दिली. मंदिराच्या नारळ गटपासून महिला व पुरुष अशा स्वतंत्र रांगेतून भाविकांचे दर्शन होत होते. महिला भाविकांची लक्षणे गर्दी होती. विश्वस्त अक्षय गोसावी, बाळासाहेब दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी आलेल्या मान्यवरांसह भाविक भक्तांचे देवस्थान समितीकडून स्वागत केले गेले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस दलाकडून मोहटादेवीला मानाची साडी चोळी अर्पण करण्यात आली. मंगळवारी सहाव्या माळेच्या सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते देवीला साडी चोळी अर्पण करून निर्विघ्नपणे यात्रा पार करून दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. अधीक्षक ओला, त्यांच्या पत्नी श्रेया ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, त्यांच्या पत्नी प्रियंका खैरे, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश तथा मोहटा देवस्थानचे विश्वस्त मयूर पवार, विद्या पवार यांच्याहस्ते देवीची आरती संपन्न झाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या