Tuesday, December 3, 2024
Homeनगरमोहटादेवी गडावर विजयादशमी निमित्ताने शमी-शस्त्रपूजन

मोहटादेवी गडावर विजयादशमी निमित्ताने शमी-शस्त्रपूजन

आज यात्रा आणि उद्या कलाकारांच्या हजेर्‍यांसह कोजगिरीला उत्सवाची सांगता

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर विजयादशमीनिमित्ताने शमी व शस्त्रपूजन कार्यक्रम झाला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त शाशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, बाळासाहेब दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व देवस्थानाची शस्त्र ठेवून पूजन करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान आज रविवारी (दि.13) मोहटा गावाची यात्रा असून रात्री देवीची पालखी मिरवणुक गावातून काढली जाईल. सोमवारी सकाळी कलावंतांच्या हजेर्‍यांचा कार्यक्रम होऊन जंगी कुस्त्यांनी या यात्रेची सांगत तर कोजागिरी पौर्णिमेला या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे व मोहटा ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.सायंकाळी मोहटादेवस्थानचे मुख्य पुजारी भुषण साकरे यांच्यासह अन्य पुरोहितांच्या मंत्र उच्चातर विजयादशमीच्या मोहर्तावर शस्त्रपूजन करण्यात आले. पुजनानंतर सायंकाळी देवीची आरती झाली. शारदीय नवरात्रौत्सवदरम्यान मोहटादेवी गडावर लाखो भविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. देवीचा होमहवन होऊन नवरात्रीची सांगत होते.

दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी देवस्थानाचे सर्व प्रकाराचे शास्त्र, वाहने, हिशोब लिखाणासाठी लागणारे वह्या आदींचे अत्यंत धार्मिक वातावरणात परंपरेनुसार हा शस्त्र पूजनाचा सोहळा गडावर देवीसमोर पार पडतो. रविवारी मोहटा गावाची यात्रा असून रात्री देवीची पालखी मिरवणुक गावातून काढली जाईल. सोमवारी सकाळी कलावंतांच्या हजार्‍यांचा कार्यक्रम होऊन जंगी कुस्त्यांनी या यात्रेची सांगत तर कोजागिरी पौर्णिमेला या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होते.

यंदा गर्दीचा उच्चांक
यंदा नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. यामुळे उत्सवादरम्यान मोहटादेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या कमालीची वाढली होती. यात्रेच्या प्रत्येक माळीला याठिकाणी गर्दी होतांना दिसत होती. यात्रा काळात भाविकांना सेवासुविधा देण्याचा प्रयत्न देवस्थानच्यावतीने करण्यात आला. यामुळे यंदाची यात्रा आगळी-वेगळी ठरली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या