Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : अत्याचार, घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Crime News : अत्याचार, घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच घरफोड्या करणारा व विविध पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जामखेड पोलीसांनी जेरबंद केले. जामखेड शहरातील मिलिंदनगर परसरातून आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फरार आरोपी ज्ञानेश्वर लिंग्या काळे (रा. जांब, ता. भुम, जि.धाराशिव) या आरोपीविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

तसेच याच आरोपीविरोधात जामखेड पोलीस स्टेशनसह कर्जत पोलिस स्टेशन, अहिल्यानगर, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा सोलापूर, वाशी पोलीस स्टेशन, तालुका भुम, जिल्हा धाराशिव अशा विविध पोलीस स्टेशनला सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी अनेक महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत फिरत होता. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना शुक्रवारी (दि. 24) गुप्त बातमीदारामार्फत आरोपी मिलिंदनगर भागात आला असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार चौधरी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलिस कॉन्स्टेबल देवा पळसे, कुलदीप घोळवे, ईश्वर माने, प्रकाश मांडगे यांच्या पथकाला आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले. आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलीस पथकाने त्यास पकडले. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्या हातात लोखंडी तलवार आढळून आली ती देखील पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...