Thursday, June 11, 2026
Homeक्राईमCrime News : वृध्दाकडील तीन लाखांची रोकड चोरणारा संशयित जेरबंद

Crime News : वृध्दाकडील तीन लाखांची रोकड चोरणारा संशयित जेरबंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वृध्दाकडील तीन लाख रूपयांची रोख रक्कम चोरून पसार झालेल्या संशयित आरोपीस कोतवाली पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत गजाआड केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. लाला किसन सुद्रीक (रा. कोंडाणे, ता. कर्जत) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील कौठे यमई येथील बाजीराव काशीबा पोकळे (वय 85) यांनी त्यांच्या आजारी मुलीच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी तीन लाख रूपयांची रोकड बँकेतून काढली होती. ती रक्कम घेऊन ते नगरला आले असता त्यांच्या ओळखीचा लाला सुद्रीक याने त्यांच्याकडील रक्कम लुटून पसार झाला होता. यासंदर्भात पोकळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून लाला सुद्रीक याचा शोध सुरू होता. रविवारी (22 फेब्रुवारी) गुन्हे तपास पथक गस्त करत असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित संशयित आरोपी पुणे बसस्थानक, अहिल्यानगर येथे येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून बसस्थानक परिसरात पाहणी केली असता संशयित इसम आढळून आला. त्याची खात्री करून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव लाला किसन सुद्रीक असल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने वृध्दाच्या उपचारासाठी आणलेली तीन लाख रूपयांची रक्कम आपणच चोरल्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण तीन लाख रूपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...