Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMonsoon Session : गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित; संसदेबाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Monsoon Session : गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित; संसदेबाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

आज अवघे एक मिनिट चालले काम,

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) आज (गुरुवारी) शेवटच्या दिवशी जोरदार गदारोळ, घोषणाबाजी आणि सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. आज लोकसभेचे (Loksabha) कामकाज अवघे एक मिनिट चालले. सभापती ओम बिर्ला यांनी ‘वंदे मातरम’चे गायन पूर्ण झाल्यानंतर कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सभागृहात उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी “मी सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे, मात्र विरोधकांचा उद्देश चर्चा करणे नसून केवळ गोंधळ घालणे हाच आहे, असे म्हटले. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या प्रचंड गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षांनी कामकाज चालवणे अशक्य असल्याचे पाहून शेवटी ‘वंदे मातरम’नंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

९६ तासांहून अधिक काळ वाया

१९ बैठकांचा समावेश असलेल्या या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचे सुमारे ११४ तासांचे कामकाज अपेक्षित होते. मात्र, विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे केवळ १७ तास ३० मिनिटेच कामकाज होऊ शकले, तर तब्बल ९६ तास ३० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाया गेला. राज्यसभेत एमएमडीआर (MMDR) दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर तेथील कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने आणि वाद

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद परिसरात दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकमेकांविरोधात निदर्शने केली. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मकर गेटजवळ निदर्शने करत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. तर दुसरीकडे, झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ एनडीएच्या खासदारांनीही आंदोलन केले.तसेच दोन्ही बाजूंचे खासदार आमनेसामने आल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या वेळी सुरक्षारक्षकांना मध्ये उभे राहावे लागले.

उत्तराखंडमधील मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ

राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्या कार्यक्रमप्रसंगानंतर झालेल्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा लावून धरला. यावेळी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी “सत्तेत असणारे खासदारच विरोधी पक्षासारखे आंदोलन करत आहेत, असे चित्र मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी टीका केली. तसेच के. सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री सभागृहात येऊन चर्चेला उत्तर देण्याऐवजी लपून का बसले आहेत? असा सवाल विचारला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...