Monday, September 28, 2026
HomeनाशिकMonsoon Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ८० किमी वेगाने...

Monsoon Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ८० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई | Mumbai

ऑगस्ट महिन्यात दडी मारल्यानंतर देशात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीप पिके धोक्यात आली असून बळीराजा संकटात सापडला होता. मात्र, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या नवीन अंदाजानुसार, पुढील २४ तासांत देशातील २४ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारताच्या (India) पूर्वेकडील राज्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ८० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. विशेषतः राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला असून, संभाव्य धोका लक्षात घेता मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या २४ राज्यांमध्ये पावसाचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, गुजरात, महाराष्ट्र, त्रिपुरा, आसाम, नागालँड, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा.

महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती

कोकण आणि मुंबई : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हाय अलर्ट जारी.
विदर्भ : अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज.
उर्वरित महाराष्ट्र : हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....