Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची घोषणा

मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची घोषणा

मुंबई । Mumbai

दीर्घकाळ खोळंबलेला आणि यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी बरसलेला मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्राला निरोप देण्याच्या तयारीत आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागांतून मान्सूनने माघार घेण्यास अधिकृतपणे सुरुवात केली असून, पुढील ४८ ते ७२ तासांत संपूर्ण महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी फिरण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे, अशी घोषणा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने केली आहे.

- Advertisement -

मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने यंदाच्या पावसाळी हंगामाचा शेवट समीप आला आहे. मात्र, ही घोषणा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी ठरणार आहे. यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडलेला नाही. परतीचा पाऊसही काही मोजक्या भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपात कोसळण्याची शक्यता असल्याने, आगामी काळात अनेक तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा तीव्र प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत देशातील १३ प्रमुख राज्यांमधून मान्सून पूर्णपणे काढता पाय घेईल. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. उत्तर आणि मध्य भारतातून मान्सून माघारी फिरत असतानाच, दक्षिण भारतात मात्र काही भागांत जोरदार तर केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या मान्सून हंगामातील धक्कादायक आकडेवारी हवामान विभागाने समोर आणली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात दीर्घकालीन सरासरीच्या अवघा ८७.४ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यतः या काळात देशभरात सरासरी ८६८.६ मि.मी. पावसाची नोंद होते; मात्र यंदा केवळ ७५९.४ मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे देशात पावसाची १२.६ टक्के तूट नोंदवली गेली असून, सन २००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे.

ताज्या बातम्या

पुरस्कार

Nashik News: मोखाड्यातील श्रद्धा शृंगारपुरेंना डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर

0
नाशिक | प्रतिनिधीनीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2026 पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम...