Wednesday, September 30, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर शहरात तीन बिबट्यांनी मारला फेरफटका

Shrirampur : श्रीरामपूर शहरात तीन बिबट्यांनी मारला फेरफटका

मोरगे वस्ती भागात बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद || परिसरात घबराट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मोरगे वस्ती परिसर, साई श्रद्धा कॉलनी येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे यांच्या घराजवळ एकाच वेळी तीन बिबट्यांनी फेरफटका मारला. काल शनिवारी पहाटे 2 वाजून 05 मिनिटांनी हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सध्या बिबट्यांचा शहरी भागात संचार वाढला असून याच भागात बिबट्या आला होता. काल रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्याच घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात 3 बिबटे आरामात वावरत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेष म्हणजे आ. हेमंत ओगले यांच्या निवास्थानापासून हाकेच्या अंतरावर हे बिबटे संचार करताना आढळून आले आहेत. यापूर्वी बिबट्याने सागर जावळे यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. तसेच श्री.झिने यांचा कुत्रा ही उचलून नेला होता. आता पुन्हा याच परिसरात 3 बिबटे वावरत असल्याने येथील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.

गेल्या चार वर्षापूर्वी दि. 5 डिसेंबर 2021 रोजी या भागात भर दिवसा बिबट्याने शिरकाव करून धूमाकुळ घातला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागली होती. चवचाळलेल्या बिबट्याने जवळपास दोन ते तीन नागरिकांना जखमीही केले होते. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकातील एका कर्मचार्‍यावर या बिबट्याने हल्ला केला होता. यात गंभीर जखमी वनविभागाच्या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता पुन्हा एक नव्हे तर तब्बल तीन बिबटे या भागात संचार करीत असल्याने परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे. शहरी भागात वन्यजीवांची वाढती वर्दळ ही पर्यावरणीय असंतुलनाची गंभीर जाणीव करून देणारी बाब ठरत आहे. तरी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ड्रोनच्या साहाय्याने घेतला शोध
काल सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान पुन्हा मोरगे वस्ती परिसरात चार बिबटे शिरल्याची चर्चा शहरात पसरली. याची दखल घेत आमदार हेमंत ओगले यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधूून परिसराची पाहणी करण्याची सूचना केली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी परिसरात ड्रोनच्या साहाय्याने बिबट्यांचा शोध घेतला मात्र, कुठेही बिबटे आढळून आले नाहीत.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...