Friday, July 3, 2026
HomeUncategorizedकोरोना : मॉर्निंग वॉक करणार्‍या 44 जणांना घेतले ताब्यात

कोरोना : मॉर्निंग वॉक करणार्‍या 44 जणांना घेतले ताब्यात

नंदुरबार – 

देशभरात लॉक डाउन असतांना आणि घरातून बाहेर न पडण्याच्या सक्त सूचना असताना आज पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या 44 जणांना पोलीसांनी ताब्यात घेवुन समज देत सुटका केली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात देशभरात लॉक डाउन असतांना आणि घरातून बाहेर न पडण्याच्या सक्त सूचना असतांना नंदुरबार शहरातील विविध भागात आज पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या 44 जणांना नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या मध्ये शहरातील अनेक उच्चशिक्षित नागरिकांचा समावेश होता.यात महिलांची मोठी संख्या होती.या सर्वांना नंदुरबार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले.

त्यांनतर त्यानंतर त्यांना सक्त ताकीद देण्यात आली.यानंतर बाहेर फितांना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचाही ईशारा यावेळी देण्यात आला.त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...