Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजघराची भिंत कोसळून माय-लेकी जखमी

घराची भिंत कोसळून माय-लेकी जखमी

नगरसूल | प्रतिनिधी Nagarsul

आज दुपारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे येथील मोठा मळा परिसरात घराची भिंत कोसळल्याने माय लेकी दोघी जखमी झाल्या. या घटनेत संसार उपयोगी वस्तू व अन्न धान्य आदीचे नुकसान झाले आहे.
.
मोठामळा येथील रहिवासी अनिल पोपट पैठणकर यांच्या घराचे पत्रे पाऊस व वादळामुळे उडाले, यावेळी घरामध्ये जेवण करत असलेल्या अनिल यांची पत्नी आशा अनिल पैठणकर आणि मुलगी सायली अनिल पैठणकर यांच्या अंगावर भिंत पडल्यामुळे आशा यांचा हात मोडला आहे तर सायली जखमी झालेली आहे.

- Advertisement -

दरम्यान जखमी आशा पैठणकर यांना येवला येथील अनिरुद्ध हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर जखमी सायलीवर नगरसूल येथील डॉ.खैरनार यांनी उपचार केले.

 

ताज्या बातम्या

अहिल्यानगर योगमय; दोन हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, काका स्ट्रट, क्रीडा भारती व विविध योग संस्था व एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने...