Thursday, March 13, 2025
Homeनगरलोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेणार्‍यांची गय करणार नाही; खा. लंके यांचा इशारा

लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेणार्‍यांची गय करणार नाही; खा. लंके यांचा इशारा

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

अधिकार्‍यांना आपण लोकांच्या अडचणीचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्या अडचणी सोडल्या जाणार नाहीत त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. आपल्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणारा मग तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला. शेवगाव तहसील कार्यालयात गुरूवारी खा. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठक व जनता दरबार उपक्रमात ते बोलत होते. सकाळी 11 वाजेची वेळ असताना दुपारी दीडच्या सुमारास बैठक सुरू झाली. उशीर झाला तरी अनेकजण बैठकीसाठी थांबून होते.

- Advertisement -

बैठकीत विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रांताधिकारी प्रसाद मते, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सेक्रेटरी अ‍ॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरिश भारदे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सुनील रासने, वजीर पठाण, एकनाथ कुसळकर यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रभारी अधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होते. शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी खा. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनता दरबार उपक्रमास हजेरी लावून विविध शासकीय विभागातील आपापल्या समस्या मांडल्या. अनेकांनी निवेदनाव्दारे आपल्या समस्यांकडे खा. लंके यांचे लक्ष वेधले.

यामध्ये पिण्याचे पाणी, रहदारीचे रस्ते, अतिवृष्टीचे रेंगाळलेले अनुदान, घरकूल, महिला बाल संगोपन, पुरवठा विभागाच्या ऑनलाईन रेशन कार्ड, मोफत धान्य वितरणातील अडचणी, प्राधान्य कार्ड वाटप, जमीन हस्तांतर, संजय गांधी स्वावलंबन व निराधार योजनेच्या प्रस्ताव मंजुरीबाबत संबंधित अधिकार्‍यांची टाळाटाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा योजनेतील सावळ्या गोंधळाचा कारभार, जलजीवन, वीजवितरण, शेवगाव शहरातील पिण्याचे पाणी, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य स्वच्छता, शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या रेंगाळलेल्या कामासह शहराच्या विविध भागात सध्या तब्बल 10 ते 12 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी वितरणातील अंतर कमी होऊन लोकांना किमान दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा आदी समस्यांचा उपस्थितांकडून अक्षरशः पाऊस पडला. तहसीलदार प्रशांत सांगडे, प्रभारी गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी तालुक्यातील सद्य परिस्थितीचा आढावा मांडला. यावेळी खा. लंके यांनी शेवगाव बसस्थानक परिसरात झालेल्या सिमेंट काँक्रिट कामाची पाहणी करून अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या.

ऊस उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचे वचन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरूवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात परिसरातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन आयोजित केले होते. खा.लंके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन स्वाभिमानीच्या मागण्यांची माहिती घेऊन विभागीय साखर आयुक्तांचे याबाबत लक्ष वेधून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचे अभिवचन दिले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब फटांगडे, मच्छिंद्र आरले, अशोक भोसले आदींसह पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...