Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं पेपरफुटीवर पहिल्यांदाच भाष्य, खुलं पत्र लिहित म्हणाले...

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं पेपरफुटीवर पहिल्यांदाच भाष्य, खुलं पत्र लिहित म्हणाले माझ्यावर वैयक्तिक आरोप…

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (Drug Inspector) पदभरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना आणि राजीनाम्याच्या मागणीला खुले पत्राद्वारे उत्तर दिले आहे. प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६मध्ये घडली, तर आपण ३ मार्च २०२६ रोजी एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. त्यामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी कशाच्या आधारावर केली जात आहे, असा सवाल भीमनवार यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

औषध निरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आतापर्यंत एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार परीक्षेपूर्वी प्रश्न मिळवून त्यांचा स्वतंत्र संच तयार करून तो काही व्यक्तींना देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर एमपीएससीने औषध निरीक्षक पदभरतीची प्रक्रिया रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

विवेक भीमनराव यांचे पत्र एमपीएससीने ‘X’ वर पोस्ट केले आहे. या पत्रात विवेक भीमनराव म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘औषध निरीक्षक’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेशी संबंधित माझ्यावर काही वैयक्तिक आरोप केले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करणे मी आवश्यक समजतो. कारण ही घटना जानेवारी 2026 मध्ये घडली होती आणि मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. तसेच 3 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला. तरीही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा उपाययोजना सुचवण्याकरिता आयोगाने एक अंतर्गत उच्च-स्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानेही एक उच्च-स्तरीय समिती गठित केली आहे.

कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, बाळा तू…

विवेक भीमनराव म्हणाले की, अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षा अधिक बळकट करण्यावर माझा संपूर्ण भर राहिला आहे. आयोगावर सोपवण्यात आलेली भरतीची वाढती जबाबदारी लक्षात घेता, परीक्षा आणि भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून, आयोगाची उच्च मूल्ये, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य व समान संधी मिळवून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे. पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

विवेक भीमनराव म्हणाले की, सार्वजनिक परीक्षांबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा लोकप्रतिनिधी, उमेदवार व नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागत करतो. तथापि, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यमापन तथ्ये, अधिकृत नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच केले जावे. सार्वजनिक भरती ही लाखो तरुण उमेदवारांचे भविष्य घडवणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे, अशा प्रकरणांचे रूपांतर अनावश्यक वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादात केले जाऊ नये, असे आवाहन विवेक भीमनराव यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट; मंत्री...

0
नाशिक | Nashik गेल्या १५ दिवसांपासून शहरातील ईदगाह मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. दहा ते बारा दिवसांपासून तीन विद्यार्थी (Student)...