Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकृष्णराज महाडिक म्हणाले, ‘मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले,...

कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, बाळा तू…

मुंबई | Mumbai
भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्ष आता थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र मुंबईतील दादर-माहिम परिसरात पाहायला मिळाले. भाजयुमोचे प्रदेश पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत, आंदोलनादरम्यान मनसेचे कार्यकर्ते अंगावर धावून आल्याचा दावा केला. या आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट कृष्णराज महाडिक यांना उद्देशून प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे नेते अमित ठाकरे हे पुण्यातील एका सरकारी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. अमित ठाकरे यांनी या फोटोबाबत आक्षेप घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवल्याचा दावा करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मुंबईतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्तेही शिवतीर्थ परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

फाशीची तयारी…मनोज जरांगेंसमोर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय बोलून गेल्या

या घटनेनंतर कृष्णराज महाडिक यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले. ‘आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो. त्यावेळी मनसेचे गुंड आमच्या अंगावर धावून आले. माझ्यावरही काही मुलं धावून आली. या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी भूमिका महाडिक यांनी मांडली.

बाळा तू चुकीच्या पक्षात
कृष्णराज महाडिक यांच्या आरोपांवर संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली. राऊतांनी महाडिकांना उद्देशून म्हटले की, ‘बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस!’ पुढे त्यांनी मुंबईच्या राजकारणाचा संदर्भ देत, ‘ही मुंबई आहे. ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकरेंचीच आहे. बाकी सगळे येतात आणि जातात,’ असे म्हटले.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही बाजूंच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मनसेचे गजानन काळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...