Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मोठी बातमी! पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मात्र, विद्यार्थी आंदोलनावर ठाम

पुणे | Pune

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवल्यात आल्याने पुण्यामध्ये एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. यातील एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून (Student) करण्यात येत होती. अखेर विद्यार्थ्यांचे या आंदोलनाला यश आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, “आमचा मुलगा…”

यासंदर्भात एमपीएससीने ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, आज रोजी आयोजित आयोगाच्या (Commission) बैठकीमध्ये रविवार,दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परीक्षेचा पुढची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या (Agriculture Department) २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी मागणी केली जात आहे. तसेच जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा : …तर न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एमपीएससीचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे,असे ते म्हणाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...