Friday, June 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु; २-३ दिवसात पैसे मिळणार

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया शुक्रवारी सुरू करण्यात आली. येत्या २ – ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा निधी जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील रक्कम एकत्र दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने फेब्रुवारी महिन्यातील हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात आदिती तटकरे आज एक्स या समाज माध्यमातून माहिती दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत सोयाबीन व डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 6 क्विंटल आवक झाली....