Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedमुक्ताईनगर : संशयित १४ जणांना जळगावला हलवले

मुक्ताईनगर : संशयित १४ जणांना जळगावला हलवले

 तीन गावांच्या सीमा बंद

मुक्ताईनगर  –

कोरोनामुक्त असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यातील 65 वर्षीय महिला आल्याने मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आरोग्य विभागाची तीन पथके पाच किलोमीटर परिसरात रुग्णांची तपासणी करीत असून तीन गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एक 65 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल काल प्रशासनाला प्राप्त झाला होता .सदरची पॉझिटिव्ह महिला मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा या गावात 13 दिवस आधी मुक्कामी राहिल्याची माहिती आज सकाळी प्रशासनाला कळताच ,

- Advertisement -

तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील व आरोग्य कर्मचारी यांनी मन्यारखेडा गावात धाव घेतली व महिलेचा ज्या ठिकाणी मुक्काम होता त्या ठिकाणाहून अकरा जणांना पुढील तपासणी साठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे .अशी माहिती मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी दिली .

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...