Sunday, November 29, 2026
Homeक्राईमCrime News : मुकूंदनगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

Crime News : मुकूंदनगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मुकूंदनगर परिसरात अवैध गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 550 किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण 1 लाख 66 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा साथीदार फरार झाला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, अरविंद भिंगारदिवे, शाहीद शेख आणि अमृत आढाव यांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी हे पथक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना मुकूंदनगरमधील संजोगनगर परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. इरफान कुरेशी हा नूर बानु शेख यांच्या घरावरील पत्र्याच्या खोलीत गोमांस विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका खोलीत गोवंशीय जनावरांच्या मांसाचे तुकडे करताना इरफान एजाज कुरेशी (वय 40, रा. अब्दुलरजा मशीदजवळ, संजोगनगर, मुकूंदनगर) हा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे 550 किलो गोमांस, 600 रुपये किमतीचे दोन सत्तूर व दोन चाकू आणि एक हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण 1 लाख 66 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

राज-का-रण : नियोजन(शून्य)बैठकीचे सोपस्कार!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिक जिल्हा नियोजन समितीची ही बैठक एक महत्त्वाची संधी होती; पण प्रशासकीय गांभीर्याचा अभाव, निधी वळवण्यासारखे...