Friday, October 30, 2026
Homeनगरमुळा उजव्या कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

मुळा उजव्या कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथील सोमनाथ रामदास थोरात या तरुणाचा मृतदेह मुळा उजव्या कालव्याच्या पुलाजवळ सापडल्याने चांदा परिसरात खळबळ उडाली आहे. चांदा येथील लोहारवाडी रोड लगत थोरात नगर येथे राहणार्‍या संगिता रामदास थोरात (वय 50) यांनी सोनई पोलीस स्टेशनला दि .27 रोजी तक्रार दाखल केली होती. सोमनाथ रामदास थोरात (वय 25) याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता फसवणुक करून अपहरण केले आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी बीएनएस क्र. 140 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र बुधवारी सकाळी चांदा पिंपळगाव रोडवरील मुळा उजव्या कालव्यावरील पुलाच्या पूर्व दिशेला सोमनाथ रामदास थोरात याचा मृतदेह कालव्यामध्ये आढळून आला. ही माहिती परिसरात समजतात अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक बाबा लबडे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा येथे पाठविला. अधिक तपास सहाय्यक फौजदार एम. आर. आडकित्ते करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकानिहाय पथके नियुक्त

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाणीयोजना अवलंबून असलेल्या जलस्रोतांच्या 1 किमी. परिघात पाणी उपशावर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली असून असा अवैध पाणी उपसा होत असल्यास गुन्हे दाखल करण्याचे...