Wednesday, February 19, 2025
Homeनगरतरुणाचा मुळा कालव्यात बुडून मृत्यू

तरुणाचा मुळा कालव्यात बुडून मृत्यू

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील देवगाव येथील आदिनाथ दगडू निकम (वय 33) या तरुणाचा मुळा उजव्या कालव्यात (Mula Canal) बुडून मृत्यू (Youth Drowned) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन (Avartan) सुरू आहे. मंगळवार दि.31 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आदिनाथ दगडू निकम हा कालव्यालगत असलेल्या शेतामध्ये कामासाठी गेला होता, काम आटपून तो हातपाय धुण्यासाठी कालव्याकडे गेला असता पाय घसरून तो पाण्यात पडला. कालव्यापासून काही अंतरावर असलेला त्याचा चुलत भाऊ नितीन रावसाहेब निकम, सुनील अंबादास निकम यांच्या ही बाब निदर्शनास आली.

- Advertisement -

त्यांनी तत्काळ पाण्यात उड्या मारल्या. परंतु तोपर्यंत वाहत्या पाण्यामध्ये आदिनाथ लांबवर वाहून गेला होता. त्या दोघांनी त्याचा खूप शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. पाण्यात बुडाल्याच्या जागेपासून सातशे ते आठशे फूट अंतरावर तो पोटचारीच्या बार्‍याजवळ एका पाईपला अडकलेला आढळून आला. आदिनाथ हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यास सात वर्षांची एक मुलगी तर पाच वर्षांचा एक मुलगा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या