Wednesday, June 10, 2026
HomeनगरRahuri : मुळा धरणात पोहताना नगरचा तरुण बुडाला

Rahuri : मुळा धरणात पोहताना नगरचा तरुण बुडाला

स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचविण्यात यश

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अहिल्यानगर येथील पाच मित्र काल रविवारी दि. 8 मार्च दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले असताना दुर्दैवी घटना घडली. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसर्‍या तरुणाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवासी मयुर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती आणि आकाश प्रभूने हे पाच मित्र रविवारी दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी मयुर कांबळे आणि नैतिक सोनटक्के या दोघांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. ते दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गा जवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र दोघांनाही व्यवस्थित पोहता येत नसल्यामुळे ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. घाबरून त्यांनी आरडाओरडा केला.

हा प्रकार लक्षात येताच परिसरातील अशोक गायकवाड, किशोर बर्डे, आमीन शेख, उमेश गंगे, रमेश निकम, संतोष गायकवाड, चांदभाई शेख, अंकुश बर्डे आदी युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या युवकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नैतिक सोनटक्के याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र मयुर लाला कांबळे (वय 24, रा. बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मयुर कांबळे याचे नातेवाईक राहुरी येथे दाखल झाले. मयुरचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी मोठा हंबरडा फोडला. मयुरच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...