कोतूळ |वार्ताहर| Kotul
गत तीन-चार दिवसांपासून पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने मुळा नदीचा विसर्गही वाढला आहे. नवीन पाण्याची आवक हळुवार होत असलीतरी 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात एकूण पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहचला आहे. काल रविवारी सायंकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 11587 क्युसेक होता. तर साठा 19720 दलघफू होता.
काही तासातच हा साठा 75 टक्क्यांच्या पुढे सरकला होता. हरिश्चंद्र गड, पाचनई आंबित व अन्य भागात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत असल्याने मुळा नदीतील विसर्ग कमी अधिक होत आहे. धरणाचा साठा मुबलक असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
कुकडीत 80 टक्के पाणीसाठा
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गत आठ दिवसांपासून पाणलोटात पाऊस सुरू असून धरणांमध्ये आवक होत असल्याने कुकडी समूह प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काल दुपारी 4 वाजता हा पाणीसाठा 23801 दलघफू झाला होता. गत वर्षी याच काळात हा पाणीसाठा 20218 दलघफू (68 टक्के) होता. गेल्या वर्षीपेक्षा 12टक्के अधिक पाणीसाठा आहे.




