Sunday, September 27, 2026
HomeनगरRahuri : धरणात आवक मंदावल्याने मुळा नदीपात्रातील विसर्ग बंद

Rahuri : धरणात आवक मंदावल्याने मुळा नदीपात्रातील विसर्ग बंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेल्या मुळा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे धरणातून मुळानदी पात्रातील विसर्ग पुर्णपणे बंद केला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुळा धरण पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, आंबीत पाचनई, कोथळा, कोहने, कोतुळ या भागात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारी आवक 977 क्युसेक्सवर आली आहे. मुळा धरणात या हंगामात नवीन 18 हजार 037 दलघफू पाण्याची आवक झाली असून धरणात 25 हजार 827 दलघफू इतका पाणीसाठा आहे.

कालपासून हवामानात बदल झाला असून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहे. जर धरणात कोतूळकडून येणारी पाण्याची आवक वाढली तर पुन्हा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे श्री. पारखे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Divya Shinde : बिग बॉस फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल, पाच...

0
पुणे । Pune सोशल मीडियावरील रील आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याच्या हव्यासामधून गुन्हेगारीकडे वळल्याचे एक धक्कादायक प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला...