Monday, September 7, 2026
Homeमुख्य बातम्याMumbai Accident News : चेंबूरमध्ये शाळेच्या धावत्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थ्याचा...

Mumbai Accident News : चेंबूरमध्ये शाळेच्या धावत्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० गंभीर जखमी

मुंबई | Mumbai

मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागांत झाडे कोसळण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यातच मुंबईतील चेंबूर (Chembur) भागातील ११ नंबर रोडवर एका धावत्या स्कूल बसवर अचानक एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस टिळकनगरमधील ‘युनिव्हर्सल शाळेची’ असल्याचे समजते.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघाताच्या (Accidennt) वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होती. झाड कोसळल्यामुळे बसच्या वरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून १० जखमी मुलांना तातडीने बाहेर काढले. मात्र, एक शाळकरी मुलगा बसमध्येच अडकून पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसवर कोसळलेले झाड अत्यंत वजनी आणि मोठे असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबीला (JCB) पाचारण करण्यात आले. तर अग्निशमन दलाने अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.

जखमी बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू

प्रशासनाने घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका रवाना केल्या होत्या. बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व १० गंभीर जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस आणि पालिका अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 275 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 11084 कॅरेटची आवक झाली....