Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाIPL 2025 Auction : मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला डच्चू देणार? 'हा' खेळाडू...

IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला डच्चू देणार? ‘हा’ खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

हा खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२५ (IPL 2025) च्या लिलावासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्व संघ आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यातून एक महत्वाची माहिती समोर आली असून कर्णधार हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघातून आगामी हंगामासाठी करार मुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा; शेख हसीना भारतात दाखल

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या स्पर्धेमध्ये नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तसेच २०२३ मध्ये आपल्या दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात धडक मारली होती.मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे देखील वाचा : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद

तसेच आयपीएल २०२४ च्या हंगामात सहभागी होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) १५ कोटी रुपयात खरेदी केले होते. तसेच नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पदावरून हटवून हार्दिक पांडयाला कर्णधार बनविण्यात आले होते.मात्र, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल देखील केले होते. तर संघातही मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

हे देखील वाचा : मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा

त्याचबरोबर संघातील काही वरीष्ठ खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खुश नसल्याच्या बातम्या माध्यमांतून जोर धरत होत्या.मैदानावरही मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंमध्ये ताळमेळ जमून आला नसल्याने संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली होती. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार पदावरून हाकालपट्टी करण्याची शक्यता आहे. तसेच त्याला संघातूनही रिलीज करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुढील हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे (Surya Kumar Yadav) सोपवले जाण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या