Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजExpress Way Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या, ४...

Express Way Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या, ४ ते ५ किमी लांब रांगा

मुंबई | Mumbai
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विचित्र पद्धतीने वाहने एकमेकांना धडकली आहेत. खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. बोगद्यामध्ये तब्बल १८ ते २० वाहनांची टक्कर झाल्याचे म्हटले जात आहे. खोपोलीजवळच्या बोरघाटातील बोगद्यामध्ये हा अपघात झाला आहे.

लोणावळा खंडाळा घाटातून खाली उतरल्यानंतर एका फुड मॉल समोर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १८ ते २० गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. दिड ते दोन किलोमीटर पर्यंत हा ट्रेलर एकामागून एक वाहनांना धडक देत गेल्याने लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

- Advertisement -

मुंबई पुणे महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना खोपोली नगर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघातग्रस्त वाहनांच्याच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या वाहनांना अपघातग्रस्त वाहनांना ओलांडून जाता येत नसल्याने जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर पोलिसांची तसेच नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...