Thursday, April 9, 2026
HomeनगरKopargaon election : कोपरगावमध्ये दुपारपर्यंत ३२.५९% मतदान

Kopargaon election : कोपरगावमध्ये दुपारपर्यंत ३२.५९% मतदान

कोपरगाव । तालुका प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आज, शनिवारी (दि. २०) सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील सात नगरपालिकांमधील रिक्त असलेल्या नगरसेवकांच्या १२ जागांसाठीही आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

- Advertisement -

कोपरगावमध्ये दुपारपर्यंत ३२.५९% मतदान

कोपरगाव नगरपालिकेसाठी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी ७:३० ते दुपारी १:३० या वेळेत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून, आतापर्यंत ३२.५९% मतदान झाले आहे. कोपरगावमध्ये एकूण ६३,४४८ मतदार असून यामध्ये ३१,१३२ पुरुष, ३२,३१२ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण २०,६७५ मतदारांनी (११,०४१ पुरुष आणि ९,६३३ महिला) आपला हक्क बजावला आहे.

उद्या लागणार निकालाचा निकाल आजचे मतदान पूर्ण झाल्यानंतर उद्या, रविवारी (दि. २१) मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी निवडणूक झालेल्या आठ नगरपालिका आणि आज मतदान झालेल्या चार स्थानिक संस्था अशा एकूण १२ संस्थांचा निकाल उद्या एकत्रितपणे जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...