Tuesday, October 15, 2024
Homeजळगावदगडाने ठेचून तरुणाचा खून ; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

दगडाने ठेचून तरुणाचा खून ; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

चोपडा – प्रतिनिधी
२८ वर्षीय युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला सदर युवकाचा अज्ञात कारणासाठी खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना अडावद (ता.चोपडा) येथे केटी नगरात उघडकीस आली.

खुनाच्या घटनेने खडबळ
खुनाचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी चार संशयितांना तपास कामी ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान अडावद पोलीस स्टेशन हद्दीत महिन्याभरातील ही तिसरी खुनाची घटना आहे.

- Advertisement -

अडावद येथील के.टी.नगरच्या मागील भागात बापू हरी महाजन उर्फ गरीब वय २८ वर्ष राहणार खर्ची ता.एरंडोल हल्ली मुक्काम लोखंडे नगर अडावद ता.चोपडा याचा लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्याची घटना दि.१ आक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या पंचनामा केला. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या