Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकांदा खरेदीसाठी नाफेड-एनसीसीएफचे नियोजन दुसर्‍या दिवशीही कोलमडले

कांदा खरेदीसाठी नाफेड-एनसीसीएफचे नियोजन दुसर्‍या दिवशीही कोलमडले

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना नाफेडने कांदा खरेदीचा अक्षरश: खेळ मांडला आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून आज दुसर्‍या दिवशी देखील कांदा खरेदीसाठी बाजार समितीत अधिकारी न फिरकल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

नाफेडच्या कांदा खरेदीचं नियोजन दुसर्‍या दिवशी फोल ठरल्याचे निदर्शनास आले. व्यापार्‍यांनी नियमित कांदा लिलाव सुरू केला. नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदीसाठी ज्या संस्थांना नियुक्त केले आहे त्या संस्थांचे प्रतिनिधी आज बाजार समितीत फिरकलेच नाहीत. शासनाचा निर्णय असूनही नाफेडचे अधिकारी आले नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाफेड आणि एनसीसीएफकडून सोमवारपासून बाजार समितीत कांदा खरेदी करण्यात येणार होती. बाजार समिती प्रशासनाने कांदा खरेदीसाठी पुर्व तयारी करण्यात आहे. सोमवारी आणि मंगळवारी या दोन्ही दिवशी मात्र नाफेड एनसीसीएफकडून एजन्सी धारकांकडून कोणीही आले नसल्याची माहिती बाजार समिती सचिव अमोल खैरनार यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...