Wednesday, September 9, 2026
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

डिग्रस |वार्ताहर| Digras

राहुरी (Rahuri) तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) डिग्रस फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 29 जून) रात्री घडली. अमोल पाराजी गावडे (वय 29, रा. डिग्रस, ता. राहुरी) असे मयत तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

अमोल गावडे हे कोल्हार येथील एका बँकेत कार्यरत होते. रविवारी रात्री बँकेतील काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीवरून कोल्हारहून (Kolhar) डिग्रस येथील घरी जात होते. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास डिग्रस फाटा (Digras Phata) येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमोल गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची (Accident) तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सहाय्यक फौजदार तुळसीदास गिते आणि पोलिस नाईक सागर नवले यांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने अमोल गावडे यांना रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे डिग्रस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमोल गावडे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि 11 महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : आरोग्य व्यवस्थेवरील हल्ले

0
डॉक्टर हा देवाचे रूप असतो’ अशी श्रद्धा समाजात पिढ्यान्पिढ्या रुजलेली आहे. आपल्या प्राणांचे रक्षण करणार्‍या, अहोरात्र रुग्णांच्या सेवेत झटणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक...