Thursday, June 18, 2026
HomeनगरAccident News : अपघातात दोघांचा मृत्यू; गुन्हा दाखल

Accident News : अपघातात दोघांचा मृत्यू; गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर-पाथर्डी रोडवरील बारादरी (ता. नगर) महाल फाट्याजवळ 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 सहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम दराडे (वय 47, शेती, रा. शिंगोरी, ता. शेवगाव) यांनी कारवरील अज्ञात महिला चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये 18 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.

- Advertisement -

अज्ञात महिला चालकाने भरधाव वेगाने आणि बेफिकिरीने व्हॅगनर चालवताना पल्सर मोटरसायकलला धडक दिली. अपघातात मोटरसायकलवरील तुकाराम कसाळ (वय 31, रा. आंतरवाली, ता. शेवगाव) यांचा सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर हरिभाऊ उर्फ हरिदास दराडे (वय 23, रा. शिंगोरी) यांचा 14 ऑगस्ट रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...