Tuesday, July 23, 2024
Homeनगरअर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. शेळके अटकेत

अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात डॉ. शेळके अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) 291 कोटींच्या कर्ज फसवणूक (Loan Fraud) प्रकरणात डॉ. नीलेश शेळके याला अटक करण्यात आली आहे. कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार, तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या एचओबीआयटी खात्यातून डॉ. शेळके याच्या खात्यात रकमा वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये (Forensic Audit) समोर आले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. शेळके याला यापूर्वी कर्ज फसवणूक प्रकरणात इतरही गुन्ह्यात अटक (Arrested) झालेली होती.

आर्थिक गुन्हे शाखेकडून नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) कर्ज फसवणूक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात बँकेच्या सर्व कर्ज खात्यांचे व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेले आहे. त्या आधारावर काही संचालक, कर्जदार व बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना यापूर्वी अटक (Arrested) झालेली आहे. शहर सहकारी बँक व नगर अर्बन बँकेतील कोट्यवधी रूपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी डॉ. शेळके अटकेत होता.

आर्थिक गुन्हे शाखेमार्फतच याचा तपास सुरू होता. त्यात शेळके याला जामीन मंजूर झालेला आहे. सोमवारी डॉ. शेळके न्यायालयात हजर होता. तेथून बाहेर पडल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offenses Branch) त्याला दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली. त्याला आज, (मंगळवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या