Thursday, May 21, 2026
Homeमुख्य बातम्याNagarparishad Election Result 2025 : जळगाव जिल्ह्यात भाजपच 'धुरंधर'; मात्र मंत्री सावकारेंना...

Nagarparishad Election Result 2025 : जळगाव जिल्ह्यात भाजपच ‘धुरंधर’; मात्र मंत्री सावकारेंना धक्का, पत्नीचा पराभव

मंत्री सावकारेंना धक्का, पत्नीचा पराभव

जळगाव | Jalgaon

जिल्ह्यातील मुक्ताईनगर, फैजपूर, धरणगाव, सावदा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, यावल, भुसावळ, वरणगाव, नशिराबाद, शेंदुर्णी, रावेर, एरंडोल, चोपडा, पारोळा अमळनेर या १८ नगरपरिषदांसाठी ०२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.२१ डिसेंबर) रोजी मतमोजणी पार पडली असता धक्कादायक निकाल समोर आले आहेत. जिल्ह्यात भाजपचे सहा, शिंदे सेनेने सहा, उबाठा आघाडी दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागेवर तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. तेथून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे निवडून आल्या आहेत.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) धरणगाव नगरपरिषद निवडणुकीत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला असून याठिकाणी नगराध्यक्षपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या आहेत. शेंदुर्णी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल, पाचोराच्या शिंदे सेनेच्या सुनिता किशोर पाटील, एरंडोलच्या नगराध्यक्षपदी भाजपचे नरेंद्र ठाकूर, नशिराबादच्या नगराध्यक्षपदी भाजपचे योगेश नारायण पाटील तर पारोळाच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे चंद्रकात पाटील विजयी झाले आहेत.

तसेच चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या नम्रता पाटील, अमळनेरच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे डॉ.परीक्षित बाविस्कर, भडगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या रेखा प्रदीप मालचे, यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी ठाकरे गटाच्या छाया अतुल पाटील, वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे, चाळीसगावच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा मंगेश चव्हाण, रावेरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता महाजन, फैजपूरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या दामिनी सराफ, सावदा नगराध्यक्षपदी भाजपच्या रेणुका पाटील, जामनेर साधना महाजन (बिनविरोध भाजप), मुक्ताईनगर संजना पाटील (शिंदे शिवसेना) निवडून आल्या आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नास विरोध करत पती-पत्नीला मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar लग्नास विरोध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती-पत्नीला लाकडी दांडके आणि गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वडगाव तांदळी (ता. अहिल्यानगर)...